दारूच्या नशेत कुटुंबावर हल्ला; चार जणांना मारहाण

बातमी शेअर करा...

दारूच्या नशेत कुटुंबावर हल्ला; चार जणांना मारहाण

जळगाव, दि. १८ मे (प्रतिनिधी):
दारूच्या नशेत आलेल्या दोन जणांनी किराणा दुकानात गोंधळ घालत दुकानातील युवकासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना १५ मे रोजी तालुक्यातील जळके गावात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षित नंदलाल जैन (वय २०) हे आपल्या वडील नंदलाल जैन, आई ममता जैन आणि काका पन्नालाल जैन यांच्यासह दुकानावर असताना, दोन जणांनी दारूच्या नशेत येऊन दुकानात गोंधळ घातला. त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी चौघांनाही शिवीगाळ करत मारहाण केली.

या घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम