दारूच्या नशेत झालेल्या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी; पत्नीही जखमी

एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा...

दारूच्या नशेत झालेल्या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी; पत्नीही जखमी
एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव | प्रतिनिधी कुसुंबा येथील आईस्क्रीम फॅक्टरी परिसरात दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने व्यापाऱ्यावर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २३ एप्रिल रोजी दुपारी घडली. या घटनेत व्यापारी मदन अमृतलाल जैन (५४, रा. गणपतीनगर, कुसुंबा) यांच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मदन जैन यांचा गणपतीनगर परिसरात कटलरी व्यवसाय आहे. २३ एप्रिल रोजी दुपारी ते आपल्या पत्नीसमवेत आईस्क्रीम फॅक्टरी परिसरात गेले असताना, दारूच्या नशेत असलेला कृणाल पाटील (रा. कुसुंबा, ता. जळगाव) त्यांच्याजवळ आला. त्याने “तुम्ही इथे काय करीत आहात?” अशी विचारणा करत अचानक तेथील पडलेल्या दगडाने मदन जैन यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात मदन जैन यांच्या डोक्याला व नाकाला गंभीर दुखापत झाली, तर त्यांच्या पत्नीला देखील दगड मारून जखमी करण्यात आले. याशिवाय, पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली गेली.

घटनेनंतर मदन जैन यांनी २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित कृणाल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मुकुंद पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम