
दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण
दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण
निमखेडी परिसरातील घटना; भावाविरोधात गुन्हा
जळगाव प्रतिनिधी : शहराजवळील निमखेडी परिसरात मंगळवारी (२ डिसेंबर) रात्री दारूच्या नशेत आलेल्या तरुणाने घरातील आई आणि पुतण्यास शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी बुधवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा प्रकाश बाविस्कर (वय ४०) हे निमखेडी येथे आपल्या आई आणि मुलगा हिमांशु यांच्यासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांचा भाऊ गजानन प्रकाश बाविस्कर हा दारूच्या नशेत घरी आला. कोणतेही कारण नसताना त्याने आई आणि हिमांशुला शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी कृष्णा बाविस्कर यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गजानन प्रकाश बाविस्कर (रा. निमखेडी) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम