
दारू पिण्यास पैसे न दिल्याने सुरक्षा रक्षकाच्या कॅबीनमध्ये तोडफोड
जीवे मारण्याची धमकी
दारू पिण्यास पैसे न दिल्याने सुरक्षा रक्षकाच्या कॅबीनमध्ये तोडफोड
जीवे मारण्याची धमकी
जळगाव (प्रतिनिधी): जिल्हा दूध संघाच्या सुरक्षा अधिकाऱ्याने दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने सुरक्षा रक्षकाच्या कॅबीनमध्ये घुसून तोडफोड केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २० मार्च रोजी रात्री घडली.
डी. के. पाटील हे जिल्हा दूध संघात सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २० मार्च रोजी रात्री आकाश राजू खरे (वय २८, रा. पिंप्राव्य हुडको) हा सुरक्षा रक्षकांच्या कॅबीनमध्ये घुसला आणि “माझ्यासाठी दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत” असे म्हणत शिवीगाळ करू लागला.रागाच्या भरात त्याने टेबलावर ठेवलेला मोबाईल काचेवर मारून फोडला आणि तुटलेला काच घेऊन सुरक्षा रक्षक सुपरवायझरला जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी सुरक्षा रक्षक ईश्वर ओंकार पाटील (वय ४७, रा. दादावाडी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आकाश खरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. विरेंद्र शिंदे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम