
दिक्षीतवाडी परिसरातून कार लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
दिक्षीतवाडी परिसरातून कार लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव – शहरातील दिक्षीतवाडी परिसरात उभी केलेली कार मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. तुकारामवाडी येथील सचिन शंकर चौधरी (वय ३६) यांनी व्यायामशाळेजवळील पंटागणातील मोकळ्या जागेत, स्पेअर पार्ट दुकानासमोर आपली कार (एमएच १९ सीयू ४४२२) रात्री नेहमीप्रमाणे पार्क केली होती.
मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कार जागेवर न दिसल्याने त्यांनी परिसरात शोधाशोध केली. आसपास चौकशी करूनही काहीच धागा न लागल्याने अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम