दिलीप पाटील सरांचे कार्य शिक्षकांसाठी प्रेरणादायी – सेवानिवृत्ती गौरव समारंभात मा.आमदार अरूण पाटील

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील अभोडा बु. येथील ग्रेडेड मुख्याध्यापक व कुसुंबा केंद्राचे प्र. केंद्रप्रमुख दिलीप पाटील हे त्यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि.३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने सेवा पूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला. दिलीप पाटील सरांचे कार्य शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार अरूण पाटील यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.चंद्रकांत पाटील, आ.अमोल जावळे, मा.आमदार राजाराम महाजन, शिरिष चौधरी, मा.जि.प. अध्यक्षा रंजनाताई पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे मा.अध्यक्ष जे.के.पाटील, डाॅ. केतकी पाटील, प्रांताधिकारी बबनराव काकडे, जळगाव डाॅयटचे प्राचार्य अनिल झोपे, शिक्षणाधिकारी विकास पाटील, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी के.पी.वानखेडे, भुसावळचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, रावेर चे गटशिक्षणाधिकारी विलास कोळी, राजेंद्र फेगडे, शा.अभियंता अशोकराव गडाख, मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहूल पंडीत, दिलीप कांबळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिलीप पाटील सरांचा ५८ गुलाबाच्या फुलांचा पुष्पहार घालून व सन्मान पत्र, भेट वस्तू देऊन भव्यदिव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच सरांच्या कार्याची माहिती देणारा सेवापूर्ती विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

मनोगत व्यक्त करतांना सरांची मुलगी आर्किटेक्ट दिव्या पाटील हीने आपल्या वडिलांविषयी मनोगतातून भावना व्यक्त करतांना वडिल व आई यांच्या विषयी अंतर्मुख करणारे समाजाभिमुख विचार प्रकट केले तेव्हा सारे सभागृह स्तब्ध झाले.सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. सरांच्या धर्मपत्नी कल्पना पाटील यांनी सरांच्या सोबतच्या जीवन प्रवासाचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले. तेव्हा सभागृहातील उपस्थित जनसमुदायाचे डोळे पाणावले. असा पाटील सरांचा सेवा पूर्तीचा भावना प्रधान, तेवढाच प्रेरणादायी प्रवासाने उपस्थितांना सरांच्या कार्याची सखोल जाणीव झाली. सरांनीही सत्काराला उत्तर देतांना मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली. या कुटुंब वत्सल तेवढ्याच भावना प्रधान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पद्माकर महाजन, प्रकाश मुजुमदार, शैलेश राणे, किशोर पाटील, दिलीप का़ंबळे, प्रविण पंडित, राहूल पाटील, हरीष गणवाणी, नितीन पाटील, सी.एस.पाटील, सुरेश पाटील, जगदीश घेटे, बाळू शिरतुरे, पंकज पाटील, दुर्वास पाटील, ललित चौधरी, गणेश धांडे, अरूण पाटील इ. मान्यवर व तालुक्यातील सर्व शिक्षक,  मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, नातेवाईक, मित्र परिवार व पत्रकार बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश राणे यांनी तर सुत्र संचालन प्रा. पंकज पाटील व निलिमा नेमाडे यांनी केले. आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख गणेश धांडे यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम