दिल्लीतील सुशिक्षित बेरोजगारांना देणार दरमहा ८,५०० भत्ता
काँग्रेसची तिसरी गॅरंटी जाहीर
दिल्लीतील सुशिक्षित बेरोजगारांना देणार दरमहा ८,५०० भत्ता
काँग्रेसची तिसरी गॅरंटी जाहीर
नवी दिल्ली I वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला सत्ता मिळाली तर ‘युवा उडान योजना’ लागू करण्यात येईल. या अंतर्गत राज्यातील प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला एखाद्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप अर्थात प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी देत दरमहा ८,५०० रुपयांचा भत्ता देणार असल्याची घोषणा काँग्रेस पक्षाने रविवारी केली आहे. पहिल्यांदा ‘प्यारी दीदी योजना’ त्यानंतर ‘जीवन रक्षा योजना’ आणि आता ‘युवा उडान योजना’ ही तिसरी गॅरंटी काँग्रेसने जाहीर केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस तथा राजस्थानचे माजी उप-मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत सुशिक्षित बेरोजगारांसाठी नवी योजना जाहीर केली. काँग्रेसला दिल्लीची सत्ता मिळाली तर ‘युवा उडान योजना’ लागू करण्यात येईल. या अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक मदत म्हणून दरमहा ८,५०० रुपये देण्यात येतील. परंतु, हा भत्ता मोफत नसेल. या बदल्यात त्यांना कंपनी,
कारखाना व एखाद्या संस्थेत स्वतःचे कौशल्य दाखवावे लागणार आहे. त्यांना संबंधित कंपनीत अप्रेंटिसशिप अर्थात प्रशिक्षणार्थी म्हणून सेवा दिली तरच हा पैसा मिळणार आहे. घरबसल्या पैसे मिळणारी ही योजना नाही, असे पायलट यांनी सांगितले. सुशिक्षितांना ज्या क्षेत्रात प्रशिक्षण मिळाले आहे, त्यांना त्याच क्षेत्रात सामावून घेतले पाहिजे. जेणेकरून ते त्यांचे कौशल्य आणखी सुधारू शकतात, असे ते पुढे म्हणाले. दिल्ली निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. आम्ही जनतेच्या समस्या ऐकून घेत आहोत. त्यानंतर, तज्ज्ञांशी चर्चा करून गॅरंटी देत असतो. देशातील युवक अडचणीत आहेत. त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे.
पण, केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप पायलट यांनी केला आहे. भाजप व काँग्रेस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. पण, काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी नवनव्या गॅरंटी घेऊन येत आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम