
दिव्या शिवरामे हिला राज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक
ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंग राजे पाटील यांच्याहस्ते गौरव
दिव्या शिवरामे हिला राज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक
ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंग राजे पाटील यांच्याहस्ते गौरव
जळगाव – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, भुसावळ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्व. बाबासाहेब के. नारखेडे स्मृती निमित्त सुगम संगीत स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत गट क्रमांक २ मध्ये भाग घेऊन कुमारी दिव्या सुदाम शिवरामे हिने प्रथम क्रमांक पटकावत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला.
या यशाबद्दल दिव्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिच्या पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
सत्कार समारंभ प्रसंगी मा. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंग राजे पाटील, धरणगाव तालुका युवा शिवसेना उपाध्यक्ष महेश पाटील बोरखेडेकर, प्रमोद पाटील (भुसावळ) व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल आयोजकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम