दीर्घ शैक्षणिक सेवेचा सन्मान; प्राचार्य काझी झमीरुद्दीन यांचा भावपूर्ण निवृत्ती समारंभ

बातमी शेअर करा...

दीर्घ शैक्षणिक सेवेचा सन्मान; प्राचार्य काझी झमीरुद्दीन यांचा भावपूर्ण निवृत्ती समारंभ

जळगाव (प्रतिनिधी) : इक़रा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने इक़रा शाहीन उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य काझी झमीरुद्दीन सईदुद्दीन यांच्या दीर्घकालीन व उल्लेखनीय शैक्षणिक सेवेच्या निमित्ताने सन्माननीय निवृत्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इक़रा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुलकरीम सालार होते. तर सचिव इजाज मलिक, संयुक्त सचिव अब्दुरशीद शेख, गुलाम नबी बागबान, अब्दुलमजीद झकरिया, अमीन बादलीवाला, तारिक अन्वर शेख, इरफान सालार, अमीज बादलीवाला आदी पदाधिकारी व मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

समारंभाची सुरुवात पवित्र कुरआनच्या तिलावतीने व दुआने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांतून प्राचार्य काझी झमीरुद्दीन यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व नैतिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या प्रामाणिक व निष्ठावान सेवेच्या जोरावर संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात नवे स्थान मिळविले, असे वक्त्यांनी नमूद केले.

काझी झमीरुद्दीन यांनी तब्बल २२ वर्षे इक़रा रेसिडेन्शियल पब्लिक उर्दू हायस्कूलमध्ये तसेच २ वर्षे इक़रा शाहीन उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्य करत संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले असून संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट झाली आहे.

यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना दिलेल्या भाषणांमुळे समारंभाचे वातावरण भावूक झाले. निवृत्त होत असलेल्या प्राचार्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

समारोपप्रसंगी काझी झमीरुद्दीन यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच ज्ञान, शिस्त व सदाचाराच्या मार्गावर संस्था भविष्यात अधिक प्रगती करो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम