
दुचाकींची समोरा -समोर टक्कर , एक ठार तर दोन जखमी
वरणगाव जवळील घटना
वरणगांव प्रतिनिधी
वरणगाव ते बोदवड रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर जबर टक्कर होऊन एकाच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास श्रीक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळ घडली .शरद भास्कर पाटील ( वय – ७० ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की दि ९ रविवार रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील आचेगांव येथील शरद भास्कर पाटील ( वय – ७० ) हे आपल्या दुचाकी क्र .एम.एच . १९ / ए .एस ६९९१ ने वरणगाव कडून आचेगावकडे जात असतांना बोदवड मार्गावरील श्री नागेश्वर मंदिराजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी क्र . एम . एच . २८ /बी .एस . ९१४१ वरील चालक शेख गनी शेख मन्यार ( वय – ६६ ) त्यांचे सोबत असलेल्या अशोक रामदास खराटे ( वय – ५५ ) दोघे रा. बोदवड यांनी जबर धडक दिल्याने या अपघातात आचेगाव येथील गंभीर जखमी झालेल्या तिघांना वरणगांव ग्रामीण रुग्णालयात आणले असता शरद भास्कर पाटील यांना खासगी डॉक्टरांनी मृत घोषित केले .तर गंभीर जखमी झालेल्या शेख गनी शेख मन्यार व अशोक रामदास खराटे या दोघांना उपचारार्थ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले . शरद पाटील यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी काही वेळ रुग्णालयात गोंधळ घातला . तर या अपघाताच्या घटने प्रकरणी वरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली असून घटनेचा सपोनि जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्रावण जवरे तपास करीत आहे .
दरम्यान या घटनेची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना . संजय सावकारे यांना मिळताच त्यांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देवून परिस्थिती जाणून घेतली व वैद्यकिय अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम