
दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एक जण जखमी
दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एक जण जखमी
जळगाव : दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत सागर
एकनाथ बारी (वय २९, रा. श्रीधर नगर) हे जखमी झाले. ही घटना दि. ९ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हॉटेल आदर्शसमोर घडली. याप्रकरणी धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील श्रीधर नगरात सागर बारी हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ९ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास (एमएच १९, डीटी ४७५२) क्रमांकाच्या दुचाकीने मानराजपार्ककडे जात होते. यावेळी समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, सीसी ७०३९) क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली.
या अपघातात सागर बारी याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी त्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना सत्यवान वारंगे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम