दुचाकीच्या डिक्कीतून २ लाखांची रोकड लंपास

बातमी शेअर करा...

दुचाकीच्या डिक्कीतून २ लाखांची रोकड लंपास

चाळीसगाव (प्रतिनिधी) दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड केवळ जांभूळ खरेदीच्या क्षणी चोरी गेल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील अंधशाळेजवळ गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील संत रोहिदास सोसायटीत राहणारे निवृत्त कर्मचारी शिरीषकुमार भास्कर लिंडायत (वय ७२) यांनी आपल्या सुनेच्या स्टेट बँकेतील कृषी शाखेतील खात्यातून १२ जून रोजी सकाळी ११.४५ वाजता दोन लाख रुपये धनादेशाद्वारे वटवून काढले. घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी ही रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून घराच्या दिशेने प्रयाण केले.

मात्र, वाटेत भडगाव रोडवरील अंधशाळेजवळ त्यांनी लोटगाडीवरून जांभूळ खरेदी करण्यासाठी दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. जांभूळ घेऊन ते ती डिक्कीत ठेवण्यासाठी डिक्की उघडताच डिक्कीतील दोन लाखांची रोकड गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

 

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, शिरीषकुमार लिंडायत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम