दुचाकीला लावलेली ३ लाखांची पिशवी लंपास

बातमी शेअर करा...

दुचाकीला लावलेली ३ लाखांची पिशवी लंपास

अमळनेर : तालुक्यातील वासरे येथील शेतकऱ्याने बियाणे व

खतांसाठी बँकेतून काढलेल्या ३ लाख रुपयांची पिवशी दुचाकीला टांगलेली होती. ही पिशवी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना १० रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील वासरे येथील शेतकरी शिवाजी भानुदास पाटील (वय ५९) यांचे अमळनेरच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. त्यात ते शेतीतील आवकच्या पैशांचा भरणा करतात. दरम्यान, १० रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शेतात पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे तसेच रासायनिक खते खरेदी करण्यासाठी ते सेंट्रल बैंक ऑफ इंडीयात पैसे काढण्यासाठी दुचाकीने गेले होते. बँकेतून सुमारे ३ लाख रूपये काढून त्यांनी हे पैसे निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवले. त्यानंतर दुपारी १.३० वाजेचे सुमारास शिवाजी पाटील हे बँकेतून बाहेर पडले. त्यांनी ही पिशवी दुचाकीच्या हॅण्डलला टांगली. त्यानंतर ते बाजारपेठ परिसरात बि-बियाणे तसेच रासायनिक खते खरेदीसाठी गेले. त्यानंतर आंबे घेण्यासाठी विजय शॉपी समोरील फळांच्या हातगाडीजवळ त्यांनी दुचाकी लावली. तर पैशांची पिशवी हि गाडीच्या हॅण्डललाच टांगलेली होती. त्यानंतर त्यांनी आंबे खरेदी करुन पुन्हा ते गाडीजवळ परत आले असता पैशांची पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरुन अमळनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम