दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू

शिरसोली रोड वर झाला होता अपघात

बातमी शेअर करा...

दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू

शिरसोली रोड वर झाला होता अपघात

जळगाव : शिरसोली रोडवर दुचाकीवरून पडून

गंभीर जखमी झालेल्या विनोद गोविंदा हटकर (वय ३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मत्यची नोंद करण्यात आली आहे.

विनोद हटकर हे वास्तव्यास होते. दि. २ मे रोजी जळगावकडून शिरसोलीकडे जात असताना इकरा युनानी महाविद्यालयाजवळ त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोकॉ समाधान टहाकळे करीत आहेत. दुसऱ्या एका अपघातात जखमी झालेले शिवाजी लोभाजी तडवी (४५, रा. लक्ष्मीनगर) यांचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम