दुचाकी चोरटा एलसीबीकडून जेरबंद

चोरलेली दुचाकी ढेकू येथून हस्तगत

बातमी शेअर करा...

चोरलेली दुचाकी ढेकू येथून हस्तगत

जळगाव : अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एलसीबीच्या पथकाने तपासचक्रेफिरवित २४ तासात संशयित ज्ञानेश्वर उर्फ नाना भगवान पवार (भिल), रा. ढेकु, ता. अमळनेर या दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळून चोरलेली दुचाकी हस्तगत केली.

अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरलेली दुचाकी ही संशयित ज्ञानेश्वर उर्फ नाना भगवान पवार (भिल) याच्याकडे असलेली माहिती स्थानिक

गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार एलसीबीतील पोलीस हवालदार संदीप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी यांचे पथक ढेकु गावात पोहचले. याठिकाणाहून त्यांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याची चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरल्याची कबुली देत चोरलेली दुचाकी काढून दिली. पुढील तपासासाठी संशयित चोरट्याला अमळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम