दुचाकी चोरट्यांकडून ८ मोटारसायकलीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई

बातमी शेअर करा...

दुचाकी चोरट्यांकडून ८ मोटारसायकलीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई
यवतमाळ – जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशेष मोहीम राबवत दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, एकूण २.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक पियुष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. १२ मार्च २०२५ रोजी गुन्हे शाखा व घाटंजी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दोन इसम चोरीच्या वाहनांसह घाटंजी शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी वाहनचोरीच्या घटनांची कबुली दिली.

तपासादरम्यान, त्यांच्याकडून विविध ठिकाणांहून चोरलेल्या ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या वाहनचोरीप्रकरणी यवतमाळ व परिसरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सुरू असून, अजूनही काही चोरीच्या गाड्या हस्तगत होण्याची शक्यता आहे.
ही कारवाईपोलीस अधीक्षक कुमार चिता व अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात उपविभागिय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वेजने, पोलीस निरीक्षक सतिष चवरे स्थागुशा, पो.नि. निलेश सुरडकर पो.स्टे घांटजी, सपोनि अजय कुमार वाढवे, पोहवा सुनिल खंडागळे, उल्हास कुरकुटे, सुधिर पांडे नापोका सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, पोशी सलमान शेख, रजनिकांत मडावी सर्व स्थागुशा यवतमाळ पोलीस स्टेशन घांटजी येथील पोहवा राहुल खडागळे, मुकेश करपते, अंकुश वहाळे, पोका छेदक मनवर, नितेश छापेकर यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम