
दुचाकी चोरट्याला अटक ; चार दुचाकी जप्त
दुचाकी चोरट्याला अटक ; चार दुचाकी जप्त
भडगाव पोलिसांची कारवाई
भडगाव प्रतिनिधी येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३ दुचाकी चोरणाऱ्याला अटक करण्यात यश आले असून या संशयितांकडून हजारोंचा मुद्देमाल भडगाव पोलिसांनी जप्त केला आहे.
येथील रहिवासी रामकृष्ण नगरमधील नाना नामदेव धनगर (वय ६३) यांच्या घराजवळून होंडा शाईन (एमएच १९, डीडी- ३७२९) ही दुचाकीची चोरी झाली होती. या प्रकरणी नाना धनगर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात भडगाव पोलिसांनी तातडीने तपास करत धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील बोरमळी येथील इंद्रसिंग भीमा पावरा याला चोरी केलेल्या दुचाकींसह अटक केली आहे.
इंद्रसिंग पावराने चौकशीत आणखी तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सर्व तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. ज्यांची १ लाख ७० हजार रुपये किंमत आहे. जप्त केलेल्या दुचाकींमध्ये हिरो होंडा शाईन (एमएच-१९, डीडी- ३७१९), टीव्हीएस कंपनीची (एमएच- १९, बीए ३७६३), सुझुकी कंपनीची (मॉडीफाय केलेली, विना नंबर) दुचाकीचा समवेश आहे. जप्त केलेल्या दुचाकींपैकी दोन दुचाकींचे मालक निष्पन्न झाले आहेत.
तर विना क्रमांकाच्या तिसऱ्या दुचाकी मालकाचा शोध सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनात पो.नि. महेश शर्मा, स.पो.नि. भरत लिंगायत, पो.हे.कॉ. नीलेश ब्राह्मणकर, पो.हे. कॉ. विजय जाधव, पो.कॉ. सुनील राजपूत, पो.कॉ. संदीप सोनवणे, पो. कॉ. संजय पाटील यांच्या पथकाने केली. तपास पो.हे.कॉ. विजय जाधव करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम