दुचाकी चोरट्याला अटक, तीन चोरीच्या दुचाकी हस्तगत

बातमी शेअर करा...

दुचाकी चोरट्याला अटक, तीन चोरीच्या दुचाकी हस्तगत

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तब्बल २ लाख २५ हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या कारवाईत आणखी दोन गुन्ह्यांचा छडा लागला आहे.

फिर्यादी सुनील पांडुरंग इंगळे (रा. पांडुरंगनाथ नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीवरून रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच-१९ ईडी-७६५०) चोरीस गेल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोरट्याला पकडले.

अटकेनंतर त्याच्याकडून इतर दोन चोरीच्या दुचाकींचा शोध लागला असून प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम