दुचाकी चोरट्या दोन भावांकडून तीन दुचाकी हस्तगत

पुसद शहर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा...

दुचाकी चोरट्या दोन भावांकडून तीन दुचाकी हस्तगत
पुसद शहर पोलिसांची कारवाई
यवतमाळ प्रतिनिधी
दुचाकी चोरट्या सख्ख्या दोन भावांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून चोरीतील तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पुसद शहर पोलिसांनी मंगळवार, २८ जानेवारीला सकाळी तालुक्यातील हीं शिवारात केली. नरेश शेषराव टारपे (४०) आणि एकनाथ शेषराव टारपे (२६) दोघेही रा. हर्षी अशी अटकेतील दुचाकी चोरट्या दोन भावंडांची नावे आहेत. २३ जानेवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरातून यादव सुर्यभान खोकले (४७) रा. घाटोडी याची दुचाकी क्र एमएच २९-बिएन ६३०९ चोरीस गेली होती.
याप्रकरणी पुसद शहर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून शहर पोलीस चोरट्यांच्या मागावर होती. दरम्यान आज सकाळी शहरचे ठाणेदार धिरज बांडे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यामध्ये संबंधित दोन संशयितांची नावे पुढे आली. त्यानंतर दोघांनाही विविध ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तेंव्हा त्या दोघांनीही तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. शिवाय त्या शेतातील गोठ्यात दडवून ठेवल्याचेही सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्यांचे शेत गाठत एक लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या. या कारवाईत फौजदार किशोर खंडार, जमादार प्रफुल्ल इंगोले, मनोज कदम, आकाश बाभुळकर, शुध्दोधन भगत, चालक अमित मेंदळकर आदिंनी सहभाग घेतला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम