
दुचाकी चोरणाऱ्या आरोपीस अटक, चार मोटारसायकली जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची द्म्दार कारवाई
जळगावात दुचाकी चोरणाऱ्या आरोपीस अटक, चार मोटारसायकली जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत एका संशयिताला अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई पार पडली.
गोलाणी मार्केट परिसरात झालेल्या दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रम चव्हाण (रा. वसंतवाडी) या संशयितास अटक केली. तपासादरम्यान त्याने चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या.
यामध्ये हिरो होंडा स्प्लेंडर (MH१९DU८२३५) , होंडा शाईन (MH१९EC३९६८) , हिरो होंडा स्प्लेंडर प्रो (MH१९BB६००५) , होंडा शाईन (MH२०FQ९७२८)य क्र्मन्काच्य दुचकी असा एकून 11 लखञ्च मुद्देमल् हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, हवालदार अकरम शेख, विजय पाटील, हरिलाल पाटील आणि प्रवीण भालेराव यांनी केली .
या यशस्वी कारवाईमुळे जळगाव शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांना लगाम बसण्याची शक्यता आहे. पोलिसांचे तपासकार्य सुरू असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम