दुचाकी, पाणबुडी मोटार चोरणारे तिघे भामटे जेरबंद

बातमी शेअर करा...

दुचाकी, पाणबुडी मोटार चोरणारे तिघे भामटे जेरबंद

जळगाव एलसीबी पथकाची कारवाई

जळगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील शेतांतून होणाऱ्या दुचाकी आणि तब्बल २९ पाणबुडी मोटार चोरीच्या गुन्ह्यांचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत छडा लावला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघा सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांनी २९ मोटारी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सोमनाथ उर्फ लंगड्या रघुनाथ निकम (रा. अंधारी, ता. चाळीसगाव) , सुधीर नाना निकम (रा. महारवाडी, ता. चाळीसगाव) , सम्राट रविंद्र बागुल (रा. महारवाडी, ता. चाळीसगाव) या तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदवली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने तिघा संशयितांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी ११ पाणबुडी मोटारी चोरल्याचे कबूल केले. कसून चौकशीनंतर चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील नांदगाव परिसरातून त्यांनी एकूण २९ पाणबुडी मोटारी चोरल्याचे उघड झाले. चोरलेले साहित्य स्वतःचे असल्याचे भासवून आरोपी ते विकत असत.

या यशस्वी कारवाईमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील, उपनिरीक्षक शेखर डोमाळे आणि कर्मचारी युवराज नाईक, महेश पाटील, भुषण शेलार, सागर पाटील, बाबासाहेब पाटील, गणेश चव्हाण, दीपक नरवाडे, संदीप पाटील, तुकाराम चव्हाण आणि विजय पाटील यांनी या कामगिरीत महत्त्वाचा सहभाग नोंदवला.चाळीसगाव आणि नांदगाव परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी चोरीला गेल्या आहेत, त्यांनी योग्य ओळख पटवून त्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातून परत घेऊन जाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम