दुर्मिळ आजाराच्या नवजात शिशुवर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

बातमी शेअर करा...

दुर्मिळ आजाराच्या नवजात शिशुवर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

नवजात शिशु तज्ज्ञांच्या टीममुळे शिशुला जीवदान

जळगाव प्रतिनिधी एका नवजात शिशुला ट्रॅकिओ-इसोफेजियल फिस्टुला अर्थात अन्ननलिका आणि श्वासनलिकेतील जोड असल्याचा दुर्मिळ आजार जडला होता. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील बाल शल्यचिकीत्सक आणि नवजात शिशु तज्ज्ञांच्या टीममुळे शिशुवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया आणि उपचार यशस्वी ठरून शिशुला जीवदान मिळाले आहे.

याबाबत माहिती अशी की, एका नवजात शिशुची अन्ननलिका आणि श्वासनलिकेला जोड होता. जन्मजात ट्रॅकिओ-इसोफेजियल फिस्टुला – बहुतेक वेळा इसोफेजियल अट्रेशिया हा अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर जन्मजात आजार असून, जगभरात दर २,५०० ते ४,५०० नवजातांमागे केवळ एका बाळामध्ये आढळतो. या विकारामध्ये श्वासनलिका आणि अन्ननलिकेमध्ये असामान्य जोड तयार होतो, ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण, आहार गिळताना त्रास, अन्न श्वासनलिकेत जाण्याचा धोका निर्माण होतो. हा धोका लक्षात घेता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बाल शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी यांनी त्याची तपासणी करून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. दुर्मिळ आणि अत्यंत जोखमीच्या या जन्मजात विकाराने ग्रस्त असलेल्या नवजात बाळावर बाल शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी, डॉ. सहार अब्दुल्ला हमदुले, डॉ. शार्दुल कांबळे, भूलशास्त्र तज्ञ डॉ. शितल आणि डॉ. आकांक्षा राजपूत यांच्या टिमने हे आव्हान स्विकारून शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर नवजात शिशुला अतिदक्षता विभागात नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कुशल धांडे, डॉ. नीरज जगताप यांनी नवजात शिशुची काळजी घेत प्रकृती यशस्वीरित्या स्थिर केली. शस्त्रक्रियेनंतर जवळपास महिनाभराचा कालावधी पूर्ण होत असताना बाळ व्हेंटिलेटरशिवाय सहज श्वास घेत आहे, आहार घेत आहे. अतिशय नाजूक अवस्थेतील नवजात शिशूपासून निरोगी बाळापर्यंतचा हा प्रवास खरोखरच आशादायी आहे.

रुग्णालयातील बाल शल्यचिकित्सा व नवजात अतिदक्षता सेवांची उच्च गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे. लवकर निदान, योग्य वेळी तज्ज्ञ शस्त्रक्रिया आणि उन्नत नवजात काळजी यांच्या संगतीने गंभीर परिस्थितीही कशी बदलवता येऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम