
देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला स्वातंत्र्यदिनाचा उत्सव
देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला स्वातंत्र्यदिनाचा उत्सव
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ध्वजारोहण
जळगाव – डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात 78 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त महाविद्यालयातर्फे विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाचा उत्साह संचारला होता. यावेळी संस्थेचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला सकाळी 7.35 वा. संस्थेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. मिश्रा, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य हर्षल बोरोले, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, सीईओ विजय बाविस्कर, रेक्टर सुरेंद्र गावंडे, अर्चना भिरूड, ज्योत्स्ना भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत भारत माता कि जय अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटिका सादर केल्या. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नुकतेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले. याविषयी डॉ. उल्हास पाटील यांनी ऑपरेशन सिंदूर विषयी माहिती दिली. तसेच देशात सक्षम सरकार असल्याकारणाने वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशोधन होत असून वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडत असल्याचे सांगितले. स्टार्ट अप, मेक इन इंडिया या संकल्पांतर्गत देश जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होत असल्याचेही डॉ. उल्हास पाटील यांनी नमूद केले. तसेच उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर, रूग्णालयातील सर्व विभागप्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
80 दात्यांचे रक्तदान
स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या रक्तपेढीतर्फे रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. 80 पिशव्यांचे रक्त संकलित केले. यशस्वीतेसाठी रक्तपेढीचे समन्वयक लक्ष्मण पाटील यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम