देशसेवा करून परतलेल्या जवानाची गावकऱ्यांनी काढली मिरवणूक ..

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

बातमी शेअर करा...

देशसेवा करून परतलेल्या जवानाची गावकऱ्यांनी काढली मिरवणूक …
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
शेगाव / प्रतीनीधी

भोनगाव – येथे जवान अतुल रामेश्वर शेळके यांनी देशसेवा पूर्ण केल्याबद्दल भव्य मिरवणूक सर्व मिञ परिवार व गावकऱ्यांनी काढली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. राजश्री लक्ष्मणराव गवई तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर एपीआय शिंदे, पं.स.माजी सभापती सुरेश शेळके, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक अमर बोरसे, शाम पहुरकर, सेवा निवृत्त शिक्षक त्र्यंबक भारंबे, ज्ञानदेव कडाळे, नितीन शेळके, श्रीराम राजगुरे, गजानन डोंगे, हरिभाऊ घोपे, दयाराम शेळके, प्रकाश बावणे, अंबादास बजारे, अरुण घनोकर, प्रवीण कोल्हे, विठ्ठल महाराज शेळके, सौ.ज्योती भारसाकळे, सौ.प्रज्ञा मोरखडे हे होते.
अतुल शेळके सारख्या जवाना कडून युवकांनी प्रेरणा घेऊन जिद्द व चिकाटीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्या गावचे नाव उंचावर नेण्यासाठी सर्वांनी काम करावे व राष्ट्र विकासासाठी पुढे यावे असे मत नितीन शेळके यांनी मांडले.

याप्रसंगी गावातील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर अतुल शेळके व त्यांच्या संपूर्ण परिवाराचा सत्कार उपस्थीतांनी केला. यावेळी मित्र परिवाराकडून त्यांची लाडूतुला देखील करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी मिञ परिवार व गावकऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर शेळके संचालन काकड तर आभार गजानन अढाव यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम