देशाच्या उभारणीत महिलांचे योगदान महत्त्वाचे – ना. रक्षाताई खडसे

भालोद येथे ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

बातमी शेअर करा...

देशाच्या उभारणीत महिलांचे योगदान महत्त्वाचे – ना. रक्षाताई खडसे

भालोद येथे ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

मुक्ताईनगर: “भारतीय संविधानाने महिलांना समान अधिकार देत त्यांच्या सन्मानाची ग्वाही दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी संविधानात समाविष्ट केल्या. त्यामुळेच महिलांचा कुटुंब, समाज आणि राष्ट्र विकासात सहभाग वाढला असून, देशाच्या उभारणीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी केले.

त्या कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे लिखित ‘संविधानाचे अमृतपर्व’ (भारतीय राज्यघटना समितीतील महिला प्रतिनिधींची ओळख) या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

संविधान सभेतील महिलांचे महत्त्वाचे योगदान

भारताच्या संविधान निर्मितीत संविधान सभा आणि मसुदा समितीचे योगदान मोठे आहे. संविधान सभेत २९६ सदस्यांपैकी १५ महिला सदस्य होत्या. त्यांचे योगदान लक्षात घेऊन, त्यांचे जीवन, कार्य आणि योगदान या ग्रंथाच्या माध्यमातून अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला आमदार एकनाथराव खडसे, प्राचार्य प्रमोद पवार, प्राचार्य किशोर कोल्हे, माजी मुख्याध्यापक पी. एस. लोखंडे, प्रा. डॉ. जतीन मेढे, प्रा. डॉ. दिनेश पाटील, प्रा. डॉ. गणेश चव्हाण, प्रा. डॉ. दिनेश महाजन, पत्रकार दीपक महाले, अथर्व प्रकाशनाचे प्रमुख युवराज माळी, सौ. विनिता सुनील नेवे आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधान अभ्यासकांसाठी महत्त्वाचा ग्रंथ – आमदार खडसे

यावेळी आमदार एकनाथराव खडसे यांनी मनोगत व्यक्त करताना, संविधान सभेतील या १५ महिला सदस्यांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध करून देणारा हा ग्रंथ अभ्यासकांसाठी निश्चितच महत्त्वाचा ठरेल, असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी मानले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम