दोडे गुर्जर मंडळातर्फे रविवारी महिला संमेलनाचे आयोजन – सुनील भाऊ चौधरी
समाज बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
मुंबई / प्रतिनिधी
दोडे गुर्जर मंडळ ठाणे – मुंबई च्या वतीने गुर्जर महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून समाज बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
असे आवाहन अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष तथा मंडळाचे अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांनी केले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, रविवार दि. 27 ऑक्टोबर रोजी दोडे गुर्जर मंडळ ठाणे – मुंबई च्या वतीने गुर्जर महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनात जेष्ठ महिला सन्मान, फराळ स्पर्धा व सुसंवादाचा कार्यक्रम होणार आहे. सदर संमेलनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील यावर सचिव सौ. क्रांतीताई हितेंद्र पाटील या उपस्थित राहणार आहेत. सदर संमेलन कल्याण डोंबिवली महानगरपालिका,
कला दालन, तारांगण सोसायटी जवळ, वायले नगर कल्याण पश्चिम येथे सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनातून समाजातील
महिलांचे एकत्रीकरण होईल, असा विश्वास व्यक्त करून आणि पर्यावरण पूर्वक दिवाळी साजरी करू या असा संदेश देण्यात येणार आहे.
या संमेलनासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष पन्नालाल पाटील, उपाध्यक्ष अंकुश पाटील, भागवत पाटील, सचिव गोरख पाटील, संचालन अर्जुन पाटील सर सहसचिव,
कोषाध्यक्ष शिवाजी पाटील, सल्लागार दिलीप पाटील, उमाकांत चौधरी, संयोजक सौ. शोभाताई पाटील व सर्व विभाग प्रमुख व पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत.
सदर संमेलन बाबत 9082449843 या मोबाईल वर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे ही वाचा👇
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने केंद्र व राज्य शासनाचे मानले आभार
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम