
दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला ‘काल्या’ ला अटक ; शनिपेठ पोलिसांची कारवाई
दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला ‘काल्या’ ला अटक ; शनिपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (वय २७) असे या आरोपीचे नाव असून, तो शहरात आपल्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
९ सप्टेंबर २०२५ रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार रवींद्र साबळे, महेंद्र पाटील आणि दीपक गजरे हे गस्तीवर असताना, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गणेश सोनवणे हा कांचन नगर येथील आपल्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी पहाटे ००.१० वाजता पंचांसह त्याच्या घरी छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेतले.
गणेश सोनवणे याला २५ जानेवारी २०२४ रोजी पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आले होते. त्याची हद्दपारीची मुदत २४ जानेवारी २०२६ पर्यंत होती. मात्र, मुदत पूर्ण होण्याआधीच तो शहरात परत आल्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार प्रतिभा पाटील करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम