दोन ॲपे रिक्षाची समोरा समोर धडक ; तरुणी ठार 

बातमी शेअर करा...

दोन ॲपे रिक्षाची समोरा समोर धडक ; तरुणी ठार 

फैजपूर आमोदा मार्गावरील घटना

फैजपूर प्रतिनिधी फैजपूर -अमोदा मार्गावर रविवारी (४ मे २०२५) दुपारी १ ते १:३० च्या सुमारास दोन ॲपे रिक्षांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. यात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले.मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी रिक्षा (MH 19 CW 3590) अमोद्याहून फैजपूरकडे येत होती, तर मालवाहू रिक्षा (MH 19 7064) फैजपूरकडून अमोद्याकडे जात होती. दोन्ही वाहनांची जोरदार टक्कर झाली.

या अपघातात सावद्याचे प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची मुलगी अदिती खडसे यांचा मृत्यू झाला. इतर जखमी प्रवाशांना फैजपूर पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले.फैजपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच्या कारणांचा तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम