धक्कादायक : चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या

चोपडा शहरापासून 20 किमी शेत शिवारातील घटना

बातमी शेअर करा...

धक्कादायक : चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या

चोपडा शहरापासून 20 किमी शेत शिवारातील घटना

चोपडा l प्रतिनिधी

चोपडा शहरापासून सुमारे 15 – 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावाच्या शेत शिवरामध्ये एका अल्पवयीन 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून

डोक्यात दगड टाकून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

धक्कादायक

याप्रकरणी एका संशयित आरोपीला LCB ने  ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या बाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, चोपडा शहरापासून सुमारे 15 ते 20 किलोमीटर असलेल्या एका  गावात एक सालदारकी करणारा परिवार

शेत शिवारामध्ये राहत होता. या परिवारातील एक अल्पवयीन 14 वर्षीय मुलगी ही घराजवळ असताना संशयित आरोपी तेथे आला. त्याने त्या मुलीला शेतामध्ये

ओढत नेऊन तिच्यावर बळजबरी करून अत्याचार केला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड टाकून निर्घण हत्या केली. सदर घटना परिसरातील गावात वाऱ्यासारखी पसरली आणि काही सुज्ञ नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवली.

https://www.facebook.com/share/v/Jj8aMusFa12mPY8F/?mibextid=jmPrMh

यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशन तसेच LCB चे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. व घटनाक्रम समजून घेतला.

तर मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

या घटनेमुळे चोपडा तालुक्यासह जळगाव जिल्हा हादरला आहे.

हे ही वाचा👇

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम त्वरित वितरित करा

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम