धनाजी नाना महाविद्यालयात एड्स जनजागृती अभियान

बातमी शेअर करा...

धनाजी नाना महाविद्यालयात एड्स जनजागृती अभियान

फैजपूर | धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील एनएसएस विभागाच्या वतीने एड्स जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन एड्स जनजागृती शपथ देवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील यांनी केले. प्रसंगी महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. सविता कलवले उपस्थित होत्या. ग्रामीण रुग्णालय, न्हावी येथील कर्मचारी श्री. मनोज चव्हाण आणि श्री. अंकुश महाजन यांनी विद्यार्थ्यांना एड्सबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

एनएसएस स्वयंसेवक अश्विनी पवार, रोहिणी माळी, श्वेता भालेराव, प्रेरणा भालेराव, दीक्षा वानखेडे, मुकेश भावसार, हर्षल महाजन, यश वाणी, रोहित पाटील यांनी जनजागृतीसाठी सक्रिय सहभाग नोंदविला.

पोस्टर प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी प्रेरणा भालेराव, कुमकुम राणे यांनी एड्स प्रतिबंध आणि जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे मांडला. अश्विनी पवार या स्वयंसेवकीने अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये एड्सविषयी वैज्ञानिक माहिती, प्रतिबंधक उपाय आणि सामाजिक जबाबदारीची माहिती देवून स्वयंसेवकांमध्ये जाणीव निर्माण केली.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि एनएसएस स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम