धनाजी नाना विदयालयात शालेय नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केले कलागुण

बातमी शेअर करा...

सावदा (प्रतिनिधी) – धनाजी नाना विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात शालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी कुटुंबप्रमुख शिरिषदादा चौधरी,संस्थाध्यक्ष.कुमार चौधरी,संस्थेचे सचिवप्रभातचौधरी,रोहिनिताई चौधरी,संचालक अशोक कोलते, प्राचार्या लता मोरे ,मुख्याध्यापिका हर्षा नेमाडे,मुख्याध्यापिका सौ.मनिषा महाजन,नेहाताई कात्रे, यज्ञाताई व परिसरातील पालक पालिका ,माजी विदयार्थीविदयार्थीनी यांची उपस्थिती होती.सुरुवातीला स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष कुमार चौधरी, प्रमुख अतिथी प्रभातदादा चौधरी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूज्य मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले.

.अध्यक्ष , प्रमुख अतिथी व उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ.मनिषा महाजन यांनी केले.विदयार्थी आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर या स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असल्याची माहिती प्रास्ताविकात मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांनी दिली. यानंतर ज्या क्षणांची विद्यार्थी आतुरतेने वाट बघतात त्या नृत्य स्पर्धेस सुरवात गणेशवंदेने झाली यानंतर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस नृत्यानी उपस्थितांना खिळवून ठेवले, यात मेरा वाला डान्स, सामी सामी गाणे मिक्स गाणे, शिवबा आमचा म्हलारी, जलवा जलवा, गुजराती गीत हालो हालो माणो तेतूडो, रणछोड रंगीला , कान्हा सो जा जरा , रिमिक्स गाणे, गवळण राधे तू हळू हळू चाल, फिरी फिरी चाल, आसामी साँग,कोळी,अहिराणी ,देशभक्ती ,गोंधळ राजस्थानी , आसामी,गुजराती गितांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावला.

39 नृत्य चार गटातील 5 वी ते 12 वीतील विदयार्थ्यांनी सादर केली.महाभारत , सावित्रीबाई थिमवर आधारित सादर केलेल्या नृत्याने सर्वांनाच भावनिक केले.तर नटरंग या लावणी नृत्याने प्रेक्षकांना ठेका धरायला लावला.आय.बी.बडगे व एन.डी.काळुसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.कुटुंबप्रमुख म.शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धक विदयार्थ्यांचे कौतूक केले व विदयार्थ्यांनी कला जोपासना केली पाहिजे,यामुळे जिवन आनंददायी होण्यास मदत होते .सावित्रीबाई फुले थिम नृत्याचे विशेष कौतुक केले.

या स्पर्धेचा निकाल –
प्रथम गट( इ.5 वी 6 वी )
प्रथम क्रमांक इब्राहिम तडवी 5वी आ गृप व द्वितीय श्रावणी होले 5 वी ब गृप. तृतीय गीत वायकोळे 6 वी क गृप
दुसरा गट (इ.7 वी 8 वी)
प्रथम क्रमांक तिक्षा महाजन 7 वी ब गृप , द्वितीय प्राची नहाले 8 वी ड तृतीय दामिनी कुंड 8वी क गृप
तृतीय गट (इ.9 वी 10 वी)
प्रथम क्रमांक सुचिता चौधरी 10 वी ब गृप द्वितीय क्रमांक ममता पाटील 10 वी ड गृप तृतीय उपासना पाटील 9 वी ब गृप
चतुर्थ गट (इ.11 वी 12 वी)
प्रथम क्रमांक अकिता पवार 12 वी विज्ञान गृप.द्वितीय क्रमांक समीक्षा इंगळे 11वी विज्ञान गृप तृतीय वैष्णवी वघुळदे 12 वी विज्ञान यांचे क्रमांक आलेत.
कार्यक्रमासाठी पालक पालिका बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री.एस.पी.चौधरी , संगीत शिक्षिका कल्पना गावंडे ,पंकज वानखेडे, सर्व शिक्षकशिक्षकेतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन मनिषा पाटील व जगदीश ढोले यांनी तर आभारप्रदर्शन बी.आर.डोळे यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम