![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2025/01/30012025_112634-scaled.jpg)
धरणगाव महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
सी.पी. आर. देऊन जीव कसा वाचवला जातो याचे प्रशिक्षण
धरणगाव महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
सी.पी. आर. देऊन जीव कसा वाचवला जातो याचे प्रशिक्षण
धरणगाव प्रतिनिधी
कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा दिनांक 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय शिंगाणे, कार्यक्रमाधिकारी डॉ. अभिजीत जोशी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. गौरव महाजन, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. स्वप्निल खरे, आय . क्यू.ए. सी. चेअरमन प्रा. संदीप पालखे, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अक्षय राजनकर , गोपाळ रांदळे ,
,भगवान पाटील, किरण पाटील अमोल कोळी, गजानन बारी, नरेंद्र मिस्त्री, अनिल सोनावणे, पुष्पक पाटील, विशाल सोनवणे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अक्षय राजनकर यांनी विविध प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन साठी लागणारे आहेत यामध्ये जर आपल्याकडे स्ट्रेचर नसेल तर दोरीच्या साह्याने कसे स्ट्रेचर बनवले जाते
तसेच, पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे जर सुरक्षारक्षक साहित्या नसेल तर पिण्याच्या पाण्याच्या संपलेल्या बाटल्या वापरून सुरक्षारक्षक कसे बनवता येते याबद्दल प्रशिक्षण दिले तसेच सी.पी. आर. देऊन एखाद्या व्यक्तीचा जीव कसा वाचवला जातो याचेपण प्रशिक्षण उपस्थित विद्यार्थ्यांना दिले. तसेच दोराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी कोण कोणत्या ठिकाणी उपयुक्त ठरतात याची माहिती व प्रसंगी उंच ठिकाणावरून कशा पद्धतीने दोरीच्या साह्याने खाली उतरता येते याचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उप प्राचार्य डॉ. संजय शिंगाणे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव महाजन, प्रास्ताविक डॉ. अभिजित जोशी तर आभार डॉ. स्वप्नील खरे यांनी मानले.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम