धरणगावात तरूणावर चाकू हल्ला; परिसरात खळबळ

बातमी शेअर करा...

धरणगावात तरूणावर चाकू हल्ला; परिसरात खळबळ
धरणगाव प्रतिनिधि

शहरात काल रात्री ११ वाजेच्या सुमारास भूषण सुरेश भागवत या तरुणावर तिघांनी हल्ला करत चाकूने सपासप वार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातील सत्यनारायण चौक येथे राहणारा भूषण सुरेश भागवत (वय ३४) हा चिंचोली येथील आरबीएल या खासगी बँकेत नोकरीस आहे. तसेच त्यांच्याकडे चारचाकी असून ते प्रवासी वाहतूक करतात. तसेच ते दुचाकी दुरुस्तीचे काम ही करतात. दरम्यान, त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी त्यांनी त्यांच्या घरासमोर लावलेल्या असतात. या दुचाकींमधील पेट्रोल यापूर्वी त्यांच्या गल्लीतील राहणारे साई अतुल कासार, तुषार ऊर्फ मुन्ना परेश नेरपगार व खत्री गलीत राहणारा क्रिश महेश राठोड यांनी चोरी केले होते.

याबाबत त्यांना त्यांनी दम दिला होता. याचा राग साई कासार व त्याचे मित्रांना होता. दरम्यान, ४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भूषण भागवत हे सत्यनारायण चौकात त्यांचे मित्र अमोल भगवान श्रीमावळे यांच्यासोबत उभे होते. याच वेळी साई कासार व त्याचा मित्र तुषार नेरपगार, क्रिश राठोड हे मद्याच्या नशेत आले. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये मागील कारणावर वाद झाला. त्यानंतर भूषण भागवत यास साई कासारने कानशिलात लगावली. तसेच चाकूने भूषण यांच्या खांद्याजवळ वार करुन जखमी केले. भूषण भागवत यांना भुरळ आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्याचवेळी मुन्ना नेरपगार व क्रिश राठोड यांनीही त्यांना मारहाण केली. भूषणचा मित्र अमोलने त्यांची सुटका केली. त्यानंतर गल्लीतील इतर मुले व अमोल यांनी त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना जळगावच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ पाठवण्यात आले. त्यानंतर या सर्वांनी घरी येवून त्यांच्या कुटुंबीयांनाही धमकी दिली. या प्रकरणी भूषण भागवत याच्या फिर्यादीवरुन साई कासार, तुषार नेरपगार, क्रिश राठोड यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम