धरणगावात रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

बातमी शेअर करा...

धरणगावात रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू
धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव शहरातील दादाजी नगर परिसरातील एका प्रौढ व्यक्तीचा धावत्या रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (५ जुलै) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव रामलाल सिताराम माळी (वय ५५) असे असून, ते दादाजी नगर, धरणगाव येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल माळी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो पुढील तपासासाठी धरणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम