धरणगाव तालुक्यातील ग्राम विकास अधिकाऱ्याला लाच स्वीकारतांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बातमी शेअर करा...

धरणगाव तालुक्यातील ग्राम विकास अधिकाऱ्याला लाच स्वीकारतांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

धरणगाव: प्रतिनिधी

विकासकामाच्या बिलासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्राम विकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७ वर्षे) यांना तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.

तक्रारदाराने खर्दे बुद्रुक गावात २.७० लाख रुपयांचे गटारी व गावहाळ बांधकाम पूर्ण केले होते. संबंधित कामाचे २.६४ लाख रुपयांचे बिल मंजूर झाले. मात्र, ग्राम विकास अधिकाऱ्याने बिल प्रक्रियेसाठी १० टक्के लाच (२७ हजार रुपये) मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर ठरवण्यात आली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शनिवारी (२२ मार्च) दुपारी धरणगावमध्ये सापळा रचला. ग्राम विकास अधिकारी ब्राम्हणे यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात अटक करण्यात आले.

या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांचा सहभाग होता.या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडा

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम