
धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला लाच घेतांना पकडले
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला लाच घेतांना पकडले
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव: धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला वर्क ऑर्डर काढण्यासाठी दिड हजार रुपयांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता करण्यात आली. अटक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव प्रवीण चौधरी आहे.
तक्रारदाराने वर्क ऑर्डरसाठी प्रवीण चौधरी यांनी लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे केली. तक्रारीच्या पडताळणीनंतर अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.
शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता कार्यालयातच प्रवीण चौधरी यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम