धरणगाव महाविद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

बातमी शेअर करा...

धरणगाव महाविद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

धरणगाव येथील पी आर हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे वाणिज्य विभागात प्रमुख वक्ते मा.श्री.सुनील पवार साहेब ( पोलिस निरीक्षक ,धरणगाव पोलिस स्टेशन) यांनी सायबर सुरक्षा जागरूकता या विषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.

सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम विद्यार्थ्यांना सायबर धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शिक्षित करतो. यात फिशिंग, मालवेअर, संशयास्पद लिंक्स आणि हॅकिंग यांसारख्या सायबर क्राइमने आपण त्रस्त आहोत यासाठी मजबूत पासवर्ड वापरणे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहणे या सारख्या धोक्यापासून संरक्षण आपण स्वतः करणे ही काळाची गरज आहे. लोकांना सुरक्षित ऑनलाइन सवयी लावण्यासाठी आणि डिजिटल जगाचा जबाबदारीने वापर करावा. आपली वैयक्तिक माहिती सार्वजनिक करू नये.आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन खरेदी, सोशल मीडिया आणि डिजिटल पेमेंटचा वापर वाढला आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारी आणि डेटा चोरीचा धोकाही वाढला आहे.यासाठी
सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करणे,व्हॉट्सॲप,फेसबुक, इन्स्टाग्राम , सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करणे आणि ऑनलाइन फसवणुकीबद्दल जागरूक राहणे. जनतेच्या शंका व तक्रारी संदर्भात टोल फ्री क्रमांक 1930 व 1945 अनुषंगाने माहिती दिली. आजच्या पिढीने मोबाईल किंवा इतर डिव्हाईस वापरतांना चांगल्या सवयी अंगीकारल्यास नक्कीच सायबर सुरक्षा जागरूकता जनसामान्यात निर्माण होईल आणि या कार्यक्रमाचा उद्देश देखील सफल होईल असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक श्री.पवारसाहेब यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.उदय जगताप यांनी आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य यांनी व्हॉट्सॲप,फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच अँड्रॉइड मोबाईल चा वापर करताना काळजी घ्यावी , फेक कॉल , व्हिडिओ कॉल ,ऑनलाइन पेमेंट करताना,मोबाईल अँप डाउनलोड करतांना विशेष काळजी घेतली गेली पाहिजे जेणे करून संभाव्य सायबर धोक्यापासून आपले संरक्षण होईल असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविक मध्ये प्रा.अमित बागुल यांनी प्रमुख अतिथीचा परिचय, सायबर सुरक्षा कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व सांगितले.

कार्यक्रमास मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.श्रीमती आर.पी. चौधरी, पर्यवेक्षक प्रा.एस.आर अत्तरदे, प्रा.व्हि.आर.पाटील , प्रा.एन.डी.सोनवणे, प्रा.डॉ.व्हि.टी.बिराजदार सर्व प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुजित जैन,सुरज वाघरे, दिपक पाटील,दुर्गेश कोळी व सर्व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम