धरणगाव शहरात चातुर्मास समाप्ती निम्मित श्री बालाजी महाराज यांना ५६ भोग
दै . बातमीदार | ८ नोव्हेंबर २०२२ | धरणगांव शहरात संपूर्ण तालुका परिसराचे आराध्य दैवत श्री बालाजी भगवान मंदिरात आज ५६ भोग कार्यक्रम संपन्न झाला । १२० वर्षाचा ऐतिहासिक परंपरा असलेल्या बालाजी मंदीरात नुकताच दोन वर्षाच्या कोरोना कालखंडा नंतर नवरात्र निमित्त वाहनोत्सव आणि रथोत्सव धूम धड़ाक्यात साजरा झाला. .
तसेच सालाबादा प्रमाणे आषाढ़ी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास समाप्ति निमित्त भरगच्च भागवत तसेच अनेक उपक्रम घेतले गेलेत .
आज प्रथमच मंदिर पुजारी गणेश पुराणिक उज्वला पुराणिक आणि नेहा वैद्य पारोळा यांच्या कल्पनेतून ५६ भोगाचे आयोजन करण्यात आले. .
सर्व भाविकांनी यात मोठ्या उत्सवाने सहभाग घेतला. प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ करून आणले होते. . सर्व प्रथम बालाजी महाराज यांना अभिषेक करण्यात आला त्यानंतर सर्व पदार्थांचा नैवद्य बालाजी महाराज यांना दाखवण्यात आला. आरती ला प्रमुख मान्यवर यजमान म्हणून बालाजी वाहन व्यवस्थापक मंडल अध्यक्ष डी आर पाटील धरणगांव अर्बन बैंक चेयरमैन हेमलाल शेठ भाटिया , कान्यकुब्ज ब्राह्मण समाज अध्यक्ष पंडित विजयकुमार शुक्ला , योगेश भाटिया प्रकाश शेठ भाटिया, शाम भाटिया ,चंद्रकांत अमृतकर यांचा हस्ते भोग महाआरती करण्यात आली त्या नंतर बालाजी महाराज यांची नामावली आणि ब्रम्ह वृंद महिलांनी विष्णु सहस्त्र नाम पठण तसेच हेमलाल भाटिया यान्नी सुदर्शन कवच स्तोत्र पठण केले . त्या नंतर सर्व बालाजी स्वयंसेवकांनी सर्व प्रसाद एकत्र करून (गोपाल काला) भाविकांना वाटला..
शहर व संपूर्ण श्री बालाजी परिसर ” लक्ष्मी रमणा गोविंदा , बालाजी महाराज की जय ” चा जयकारा दणाणून गेले. . या कार्याक्रमास सहकार्य सौ लीलाताई चौधरी यांचे लाभले. गणेश भाटिया यांनी मंदिराची सजावट करून दिली होती तसेच राजू शेठ सिकरवार यांनी मंडपाची सोय करून दिल्या मुळे हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. त्या बद्दल पुजारी गणेश आणि उज्वला पुराणिक यान्नी सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून असेच वेळोवेळी आपले अनमोल सहकार्य मिळो ही बालाजी चरणी प्रार्थना आणि बालाजी महाराज सर्वांचे कल्याण करो अशी सदिच्छा व्यक्त केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम