६ वर्षीय बालिकेची प्रशासनाला धाडसी साद
धुळे शहरातील वाहतूक सिग्नल त्वरित कार्यान्वित करा!
६ वर्षीय बालिकेची प्रशासनाला धाडसी साद
धुळे शहरातील वाहतूक सिग्नल त्वरित कार्यान्वित करा!
धुळे प्रतिनिधी
शहरातील वाहतूक सिग्नल बंद असल्याने होणाऱ्या समस्यांची जाणीव होत, कु. भव्य तेजल जयेश बाफना (वय ६ वर्षे) हिने स्वतः पोलिस व प्रशासनाला पत्र पाठवून तक्रार केली आहे. सार्वजनिक सुरक्षेबद्दल एका लहानग्या मुलीने दाखवलेली ही संवेदनशीलता संपूर्ण समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
आज प्रशासनाला पाठवली तक्रार!
दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी जयेश दिनेश बाफना यांनी आपल्या कन्येच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र, पोलीस अधीक्षक धुळे, जिल्हाधिकारी धुळे यांना ईमेलद्वारे अधिकृत तक्रार पाठवली. या तक्रारीसोबत भव्य हिने स्वतःच्या हस्ताक्षरातील निवेदनही संलग्न करण्यात आले आहे.
वाहतूक विस्कळीत, नागरिकांच्या सुरक्षेला धोका!
शहरातील वाहतूक सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी, रस्त्यावरील शिस्तभंग आणि अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. विशेषतः शाळकरी मुले, पादचारी आणि वृद्ध नागरिक यांच्या सुरक्षेसाठी हे त्वरित दुरुस्त होणे गरजेचे आहे.
प्रशासनाने त्वरित कारवाई करावी!
या ६ वर्षीय बालिकेच्या निरागस पण जबाबदार तक्रारीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी व शहरातील सर्व वाहतूक सिग्नल त्वरित कार्यान्वित करावेत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. वाहतूक शिस्त व नागरिकांची सुरक्षितता यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी सर्वसामान्य जनतेचीही अपेक्षा आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम