धानवड येथे स्व.रावसाहेब पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त नवलसिंगराजे पाटील यांच्याकडून अभिवादन

बातमी शेअर करा...

धानवड येथे स्व.रावसाहेब पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त नवलसिंगराजे पाटील यांच्याकडून अभिवादन

जळगाव प्रतिनिधी I तालुक्यातील धानवड येथे स्व. रावसाहेब पाटील यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात त्यांच्या कार्याची आठवण काढत विविध मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या वेळी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंगराजे पाटील यांनी उपस्थित राहून रावसाहेब पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रावसाहेब पाटील यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, कामगार, युवक यांच्या विकासासाठी अखेरपर्यंत झटून काम केले. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी ठरते.

यावेळी तालुकाप्रमुख शिवराज पाटील, अर्जुन गजमल पाटील, जितेंद्र पाटील, दिलीप आगीवाल, अविनाश पाटील, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत समाजकारण, शिक्षण आणि विकास क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

याप्रसंगी गावातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम