
धानोरा आश्रमशाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहीम व “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ
धानोरा आश्रमशाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहीम व “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ
जळगाव (प्रतिनिधी) : दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी धानोरा आश्रमशाळेत विशेष गोवर-रुबेला लसीकरण मोहीम तसेच “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानांतर्गत तालुकास्तरीय विविध आरोग्य शिबिरांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या प्रसंगी धानोरा आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक वर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय कार्यक्रमाला चंद्रशेखर पाटील, माणिकचंद पाटील, दिलीप पाटील, पंढरीनाथ बाविस्कर, चंद्रशेखर साळुंखे, प्रमोद बाविस्कर, गोकुळ साळुंखे, राजेंद्र कोळी, पप्पू पाटील, बापू बाविस्कर, संजय पाटील, एकनाथ पाटील, प्रशांत पाटील, अविनाश नन्नवरे, कैलास इंगळे, संजय इंगळे, नाना कोळी, श्रावण कोळी, दिलीप शेंगदाणे, रवी टेलर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना थेट आरोग्यसेवा मिळणार असून रोगप्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम