धानोरा पीक संरक्षण संस्थेच्या चेअरमनपदी योगेश पाटील, उपाध्यक्षपदी किशोर राजकुळे

संचालक मंडळाच्या उपस्थितीत बैठक

बातमी शेअर करा...

धानोरा, ता. चोपडा | प्रतिनिधी

धानोरा येथील पीक संरक्षण सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश चुडामण पाटील, तर उपाध्यक्षपदी किशोर रतिलाल राजकुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेसाठी संचालक मंडळाच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या निवडीसाठी माजी उपसभापती माणिकचंद महाजन, सरपंच रज्जाक तडवी, युवराज महाजन, सुभाष पाटील, कैलास महाजन, सतिष महाजन, राजेश पाटील, रामचंद्र महाजन, प्रकाश महाजन, दिलीप महाजन, सुनिल माळी, प्रविण माळी, भोलू माळी, सुरेंद्र महाजन यांनी विशेष प्रयत्न केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.ए. पाटील यांनी काम पाहिले, तर सचिव निळकंठ मोतीलाल महाजन यांनी सहकार्य केले.

यावेळी संचालक मंडळातील पन्नालाल पाटील, अशोक महाजन, केशरलाल महाजन, जगतराव पाटील, शशिकांत महाजन, जितेंद्र महाजन, लतिकाबाई महाजन, मंगलाबाई महाजन, सावंत महाजन, कडू कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम