धानोरा विद्यालयाची खासदार चषकात हॅट्रिक

बातमी शेअर करा...

धानोरा विद्यालयाची खासदार चषकात हॅट्रिक

खो-खो स्पर्धेत विजयी व उपविजयी चषकांवर शिक्कामोर्तब

धानोरा (ता. चोपडा) : भुसावळ येथे पार पडलेल्या खासदार चषक क्रीडा स्पर्धेत खो-खो या क्रीडा प्रकारात धानोरा येथील झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना.भा. पाटील ज्युनियर कॉलेजने नेत्रदीपक कामगिरी करत विजयी व उपविजयी चषकांची हॅट्रिक साधली. या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा परंपरेचा गौरव आणखी उजळून निघाला आहे.

१७ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावून विजयी चषकावर आपले नाव कोरले. याचबरोबर १९ वर्षांखालील मुलांचा संघ व १९ वर्षांखालील मुलींच्या संघानेही दमदार खेळ करत उपविजेतेपद मिळविले. अशा प्रकारे विद्यालयाने एक विजयी व दोन उपविजयी चषक पटकावत स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.

विजयी व उपविजयी संघांचा सन्मान केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शालेय समिती सदस्य सागर चौधरी, क्रीडाशिक्षक देविदास महाजन तसेच तिन्ही संघांतील खेळाडूंना चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या यशामागे क्रीडाशिक्षक व क्रीडाविभाग प्रमुख देविदास महाजन यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे नमूद करण्यात आले. विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समितीचे ज्येष्ठ संचालक बी. एस. महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, व्ही. सी. पाटील, अनिल महाजन, प्राचार्य के. एन. जमादार, उपमुख्याध्यापक एस. पी. महाजन, पर्यवेक्षक एल. डी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या संकल्पनेतून भुसावळ येथे हा खासदार चषक क्रीडा उपक्रम राबविण्यात आला असून, मान्यवरांनी धानोरा विद्यालयाच्या क्रीडा यशाची आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल कामगिरीची प्रशंसा केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम