
धारदार कोयता घेऊन दहशत माजवणारा युवक जेरबंद
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव,;- पांडे चौकात धारदार कोयता हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या अतुल विश्वनाथ गुप्ता (वय ३२, शिवाजीनगर हुडको) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. १४ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अतुलने नागरिकांमध्ये भीती पसरवली.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याच्याकडून कोयता जप्त केला. कॉन्स्टेबल किरण पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल असून, पोलीस हवालदार दत्तात्रय बडगुजर तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम