
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्थांना प्रस्ताव सादरीकरण्याचे आवाहन
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्थांना प्रस्ताव सादरीकरण्याचे आवाहन
जळगाव, :धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता प्राप्त अनुदानित/विना अनुदानित/कायम विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2025-26 अनुदान प्राप्त करण्यासाठी जळगांव जिल्हयातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी अल्पसंख्यांक विकास विभाग च्या तरतूदीनुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करावे, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. व तसेच या योजनेअंतर्गत पायाभूत सोयीसुविधेसाठी मर्यादा रु. 2.00 लाखावरुन वाढवून रु. 10.00 लाखापर्यंत करण्यात आली आहे.
अल्पसंख्यांक विकास विभाग शासन निर्णय 07 ऑक्टोबर, 2015 अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.असे जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्द पत्राकान्वये कळविले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम
