धार येथील अब्दुल रज्जाक कादरी बाबा यांचा उद्या संदल

बातमी शेअर करा...

धार येथील अब्दुल रज्जाक कादरी बाबा यांचा उद्या संदल

अमळनेर तालुक्यातील धार येथील हजरत सय्यद अब्दुल रज्जाक शाह कादरी पीर बाबांची उर्स यात्रा दरवर्षी उर्दूच्या मोहरम महिन्याचा ५ तारखेला मोहरम तर महिन्याच्या ४ तारखेला म्हणजे ३० जूनला संदल राहिल. तर मोहरमच्या ५ तारखेला म्हणजेच १ जुलैला उर्स यात्रा साजरी होणार आहे.

घार येथील सय्यद अब्दुल रज्जाक शहा पीर बाबा हिंदू अन् मुस्लिम समाजाच्या एकतेचे प्रतिक आहे. दरवर्षी या यात्रेमध्ये गुजरात, मध्य प्रदेश, व महाराष्ट्र राज्यातून हजारोच्या संख्येने भाविक येत असतात. उर्स यात्रेत येणाऱ्या भाविकांनी दुचाकी, चार चाकी वाहने आपल्या पार्किंगमध्येच लावावीत, असे आवाहन

कमिटीचे अध्यक्ष हाजी नईम मुजावर, उपाध्यक्ष हाजी कलीम मुजावर, सेक्रेटरी व्ही. एन. मुजावर तसेच संचालक अलीम मुजावर, अलाउद्दीन मुजावर, गयास मुजावर, रफिक मुजावर, सलाउद्दीन मुजावर, असलम मुजावर, साजिद मुजावर, जमील मुजावर, युसूफ मुजावर, मुशीर मुजावर, अहेलेकार चिराकुद्दीन मुजावर, बाबू पेंटर, गुड्डू मुजावर, शकील मुजावर यांच्यासह पंच कमिटीने केले आहे. यानिमित्त माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी यात्रेनिमित्त सर्व हिंदू, मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम