धावत्या कारमध्ये गोळीबार करणाऱ्यास पाच दिवसांची कोठडी

बातमी शेअर करा...

धावत्या कारमध्ये गोळीबार करणाऱ्यास पाच दिवसांची कोठडी

जळगाव : धावत्या कारमध्ये बंदुकीची गोळी लागून एक जण जखमी झाल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तोहित कय्यूम देशपांडे (वय २३, रा. पाळधी, ता. धरणगाव) याला अटक केले.

कारमध्ये जात असताना तोहित देशपांडे

याच्या हातातील बंदुकीतील गोळी नाजीम फिरोज पटेल (वय २५, रा. पाळधी, ता. धरणगाव) हे जखमी झाले होते. घटनेनंतर स्थानिक गुन्हे । शाखेने पोलिस निरीक्षक बबन आव्हाड । यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि शरद बागल, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, पो हे कॉ अक्रम शेख यांनी तोहित देशपांडे याचा शोध घेत त्याला गेंदालाल मिल परिसरातून ताब्यात घेतले. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम