
धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढ ठार
धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढ ठार
म्हसावद–शिरसोली दरम्यानची घटना
जळगाव प्रतिनिधी – म्हसावद ते शिरसोली रेल्वे मार्गावर शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी धावत्या रेल्वेचा धक्का बसून कुऱ्हाड गावातील बापु गणपत चव्हाण (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सायंकाळी अंदाजे ६ वाजता ही दुर्घटना घडली असून, रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. त्यांच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरून मृताची ओळख पटली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गणेश वंजारी करीत आहेत. या दुर्घटनेमुळे कुऱ्हाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम