धुरखेडा येथे घराची भिंत कोसळून वृद्ध महिला ठार

बातमी शेअर करा...

धुरखेडा येथे घराची भिंत कोसळून वृद्ध महिला ठार
रावेर : गेल्या चार दिवसापासून रावेर तालुक्यात पाऊस सुरू आहे. या सततच्या पावसामुळे रावेर तालुक्यातील धुरखेडा येथे जीर्ण झालेल्या भिंतीजवळ बसलेल्या पार्वताबाई भागवत आटकळे (वय ७२) यांच्या अंगावर अचानक भिंत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २ सप्टेंबरला दुपारी अडीच
वाजेच्या सुमारास घडली. ही भिंत मातीची असून सततच्या पावसामुळे भिजून जीर्ण झालेली होती. या संदर्भात तलाठी यांनी पंचनामा केला असून या परिवाराला आपत्कालीन मदत द्यावी, अशी नातेवाईकांकडून मागणी होत आहे. पार्वताबाई या भागवत मरू अटकाळे यांच्या पत्नी होत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम