धुळे येथे प्रलंबित प्रश्न समर्पक उत्तर व मार्गासह शिक्षक दरबार

शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

धुळे येथे प्रलंबित प्रश्न समर्पक उत्तर व मार्गासह शिक्षक दरबार

शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे मार्गदर्शन

धुळे प्रतिनिधी

नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी धुळे जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक दरबार जे आर सिटी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मनीष पवार , प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कुवर , वेतन पथकाचे अधीक्षक श्री शर्मा तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी अध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेत अनेक प्रश्नांना उपस्थित अधिकारी वर्गासमोर तात्काळ कार्यवाही करून प्रलंबित प्रश्न वेळेत मार्गी लावण्याचे आदेश शिक्षक आमदार किशोर दराडेयांनी दिले. तसेच वेतन पथकाकडे बाकी असलेली प्रलंबित देयके पुढील वीस दिवसात मार्गी लावून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अनुकंपाची ऑर्डर तात्काळ सायंकाळपर्यंत देण्याचे आदेश शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिले. व शिक्षकांच्या प्रश्नांना ज्ञाय मिळवून दिला याबद्दल शिक्षकांनी आमदारांचे आभार व्यत केले.

त्याचप्रमाणे अनेक शिक्षकांनी सादर केलेली निवेदने यावेळी आमदार यांनी स्वीकार करत शिक्षकांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांची समाधानकारक उत्तरे व मार्ग दिल्यानंतर आजचा शिक्षक दरबार संपन्न झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम